अभियांत्रिकीचा विद्यार्थी निव्वळ पुस्तकी शिक्षण घेत नाही. त्याला शिक्षणादरम्यान प्रात्यक्षिके करावी लागतात. (प्रात्यक्षिके करणे आणि 'व्यवहारोपयोगी' 'प्रशिक्षण घेणे' यात फरक आहेच). कॉलेजमधून बाहेर पडल्यावर तो लगेच इमारत किंवा पूल बांधू शकतो, किंवा यंत्रसामग्रीमधले दोष शोधू शकतो (मी म्हटलेच आहे - एखादा अपवाद वगळता.. म्हणजेच एखादा असामान्य बुद्धीक्षमतेचा नवपदवीधर हे करेलही आणि करू शकतो म्हणणे वेगळे आणि करणे वेगळे.. पण 'प्रशिक्षण' वेगळेच असते. शिवाय तो ते बांधकाम करत असताना त्याचे पद 'प्रशिक्षणार्थी' म्हणजेच 'ट्रेनी' असेल - त्या प्रकल्पावर तो 'मुख्य अभियंता' असेल? मला नाही वाटत). . डॉक्टर थेट दवाखाना थाटू शकतो व शस्त्रक्रिया करू शकतो (असे? मग डॉक्टरला 'ईंटर्नशिप' करावी लागते त्याला 'प्रशिक्षण' नाही म्हणायचे काय?), आणि आयटीवाला संगणकावर कामे करू शकतो (नाही, अजिबात नाही.. सर्व आयटी कंपन्या नवीन पदवीधरांना 'प्रशिक्षणासाठी' त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात सहा महिने वगैरे पाठवतातच - सरळ कामावर रुजू करून घेत नाहित. कुठल्यातरी लहान कंपन्या कदाचित प्रशिक्षण देत नसतीलही पण त्या कंपन्यातील अनुभव गाठीशी घेउन कुणी मोठा मोबदला मिळेल अश्या जागी जाउन त्या ठिकाणी विना प्रशिक्षण रुजू होउ नाही शकणार) . प्रशिक्षण हे त्या क्षेत्रातल्या एखाद्या छोट्याशा हिश्श्याकरता लागणारे विशेष शिक्षण असते. वैद्यकीय उपचारासाठी किंवा वैद्यकीय तपासणीसाठी एखादे नवीन तंत्र जेव्हा शोधले जाते, तेव्हा त्या तंत्राची माहिती करून घेऊन ते वापरात आणण्यासाठी प्रशिक्षण लागते. (हे बरोबर आहे)