इंटर्नशिप हे प्रशिक्षण नसते, तो एक अनुभव असतो. तसे पहिले तर डॉक्टर, वकील, आणि करसल्लागार आयुष्यभर प्रॅक्टिस करत असतात. ते खरी मॅच कधीच खेळत नाहीत, म्हणजे ते आयुष्यभर इंटर्नशिप करतात की काय? इंटर्नशिप हा डॉक्टरांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग असतो. ती केली की ते रुग्णालयात काम करण्यास समर्थ होतात. रुग्णालयात काम करणे हे वैद्यकीय व्यवसायाचे एक छोटे अंग असते.
सर्व आयटी कंपन्यांत एकसारखे काम होत नसते. त्या विशिष्ट कंपनीत काय काम होते याची माहिती होण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते. म्हणजे परत संगणकशास्त्राच्या एका छोट्याशा अंगाचे शिक्षण.
वेगळ्या कंपनीत पूर्णपणे वेगळे काम होत असेल तर तेथे जाण्यासाठी परत नवीन प्रशिक्षण घ्यावे लागत असणार. नोकरीमध्येसुद्धा बदलीच्या जागेवर गेले ची आठवडाभर तिथल्या कामाची ओळख करून घेण्यात जातात. हेही प्रशिक्षणच असते. थोडक्यात काय तर प्रशिक्षण म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याचे शिक्षण. हे बहुधा शाळा-कॉलेजच्या शिक्षणानंतर घ्यावे लागते. ज्या कामासाठी शालेय शिक्षणाची अट नसते, तिथे थेट प्रशिक्षण घेता येते.