आज भारतात भ्रष्टाचार प्रमाणाबाहेर वाढला आहे. तो कमी करण्यासाठी ज्याने ज्याला जमेल तसा विरोध केला पाहिजे. अण्णा त्यांच्या परीने प्रयत्नांची शिकस्त करत असताना त्यांचा असा तेजोभंग करणे बरोबर नाही. सामान्य माणूस रोजच्या जीवनमरणाच्या संघर्षात आकंठ बुडलेला आहे. ज्यांना शक्य आहे ते हातपाय गाळून बसले आहेत. अशावेळेस कोणीतरी आपल्या पुढच्या पिढीसाठी त्याग करत आहे हीच मोठी गोष्ट आहे. अण्णांची सर्व मते पटोत वा न पटोत, भ्रष्ट राजकारण्यांपेक्षा ते शतपटीने वंदनीय आहेत.