भारतात ब्रिटिश राज्य सुरू झाले ते १८५७ नंतर. ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध संस्थानिक ह्यांच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनी जिंकली खरी पण कंपनी खिळखिळी झाली आणि १८५८ साली ब्रिटिश सरकारने ती ताब्यात घेतली.

समजा संस्थानिक जिंकले असते तर ????

कदाचित भारत नावाचा एक देश बनलाही नसता. अगदी पाच-सहाशे जरी नाहीत तरी सात-आठ वेगवेगळे देश बनले असते असे मानण्यास जागा आहे. भौतिक सुविधा इंग्रज नसते तरी आल्याच असत्या. परंतु लोकशाही आली असती किंवा नाही हा जरूर वादाचा मुद्दा आहे.