विषय तसा वेळ घालवण्यासाठी चांगलाच आहे.

या विषयाची दुसरी बाजू म्हणून इंग्रजांमुळे आपले नेमके काय नुकसान झाले असाही होवू शकतो.

इंग्रज आले तेंव्हाची राजकीय स्थिती बघीतली तर एत्तदेशी राजे हे नवीन तंत्रासाठी पूर्ण उदासीन आणि अनभिज्ञ असेच होते. प्रजेच्या हिताबद्दल दक्ष असणारे राजे हे हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते.

राष्ट्रवादाची व्याख्या ही आधुनिक जगाची देणगी आहे. कदाचित ब्रिटिश यांना त्याचे राजकीय आणि आर्थिक लाभ लवकर घेता आले इतकेच.

एक गोष्ट मला मात्र नमूद करावीशी वाटते, आपल्या देशातील जितके काही परकीय शासक झाले त्यांच्या तुलनेत इंग्रजाची राजवट ही जास्त लोकाभिमुख अशीच होती.

पद्म