इंग्रज नसते तर मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारतावर हुकूमत गाजवली असती असा साधारण अंदाज आहे. कारण शिवाजी महाराजां नंतर पेशव्यांनी मराठा राज्य अटकेपार नेले पण ते पुढे चालवणारे कोणी नसल्याने खिळखिळे झाले असते. ह्या बाबत शिवाजी राजे व पेशव्यांच्या मधील काळातला इतिहास बारकाईने वाचून व तपासून पाहवा लागेल कारण त्याच काळात पोर्तूगीज व इंग्रजांचे भारतातील येणे जाणे वाढले होते. पण सिक्वेंस काहिही असो, भारतीय हिंदू राज्यकर्ते एकत्रीतपणे राज्यकारभार चालवूच शकले नसते व त्यांच्या लाथाळ्यांचा फायदा निश्चितच मुस्लिम राजांना झाला असता.

अर्थात हा माझा 'जर / तर ह्या विषयी' प्राथमीक अंदाज आहे व ह्या बाबत म्हणावे तेव्हढे वाचन अजून केलेले नसल्याने पक्का अंदाज बांधणे जरा कठीण जाईल.