तुम्ही आधी आलेले दिसलात. म्हटले याही वेळी पहिला नंबर मारणार मिलिंदराव... तुम्ही ध्रुवपदाच्या भाषांतरासाठी थांबलेले असावेत.
उत्तर बरोबर आहेच अभिनंदन.
तुमचे ध्रुवपदाचे भाषांतर मात्र केवळ उच्च आहे. शेवटची ओळ तर फारच मस्त जमली आहे.
पहिल्या दोन ओळींचे चार तुकडे म्हटले, तर मूळ गाण्यात ध्रुवपदाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या तुकड्याचे यमक जुळवलेले आहे. तुम्ही फक्त दुसऱ्या आणि चौथ्या तुकड्याचे जमवले आहे. (बाकी उरलेल्या गाण्यात तसेच आहे म्हणा) मी माझ्या ध्रुवपदाच्या भाषांतरात चारही तुकड्यांचे यमक जुळवले आहे ध्रुवपद उघडेन तेव्हा. पहालच!
सहभागाबद्दल धन्यवाद. लोभ आहेच तो वाढावा.