अण्णांच्या उपोषणाने भ्रष्टाचार संपेल असा अण्णांचा दावा नाही. उपोषण भ्रष्टाचाराविरुद्ध नाही तर सरकारी कुचकामी लोकपालविधेयकाऐवजी सक्षम विधेयक आणावे यासाठी आहे.
उपोषण हा मार्ग चुकीचा आहे असे लिहिणाऱ्यांनी दुसरा मार्ग सुचवावा. आत्तापर्यंत जरी अनेकदा लोकपाल विधेयक लोकसभेत मांडण्याचा प्रयत्न झाला आहे, तरी एकदाही पसार होऊ शकले नाही. भ्रष्ट पार्लमेन्ट हे सार्वभौम आहे असे लेखकाला वाटते का? अण्णा आणि त्यांची चळवळ ही दलितविरोधी आहे आणि ते आंबेडकरांची(! ) राज्यघटना मोडायला निघालेले आहे असा प्रचार एक दलित नेते करीत आहेत. अण्णा स्वतः भ्रष्टाचारी आहेत असे कपिल सिब्बल, दिग्विजयसिंग आणि धुळ्यातील उद्योगपती आणि महाराष्ट्राचे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बडतर्फ झालेले जैन म्हणताहेत. अण्णा हे अमेरिकन पाठिंब्यावर, कॉर्पोरेट कंपन्यांच्या पैशावर चळवळ करीत आहेत असाही विचार काँग्रेसवाले पसरवीत आहेत. अण्णांचा प्रचार होऊ नये म्हणून ऑर्कुट, फेसबुक, एकगठ्ठा एस्एम्एसवर बंदी आणायचा सरकारचा विचार आहे.
ही सर्व मंडळी अण्णांना संपवायचा विचार करताहेत. आपणही असले लेख लिहून त्या लोकांना मदत करावी का?