भ्रष्टाचाराचे मूळ माणसाच्या मनात आहे असं वाटतं. मुळातच मोठ्या माणसाला (म्हणजे पदावरच्या) खूष करण्याची  जी सवय आहे ती नाहिशी झाली तरच भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल. (त्यानी एखादं काम नियमाप्रमाणे केलं , यात विषेश काही नाही , हे लक्षात ठेवले पाहिजे )
ही सवय आपल्याला देशात वेगवेगळी संस्थानं होती तेव्हापासून लागलेली असावी. इंग्रजांच्या राज्यात तिने बाळसे धरले आणि स्वातंत्र्यानंतर
ती भरभराटीस आली असं वाटतं. त्याचप्रमाणे आपले काम हे राष्ट्रीय आहे ही जाणीव नसल्याने या सवयीला खतपाणी घातले जाते. आपल्या
कामामुळे राष्ट्राच्या उत्पन्नात भर पडणार आहे याची शिकवण आपल्याला दिली गेली नाही. तसच नुसते मोठे मासे गळाला लागूनही  फारसा
उपयोग होणार नाही. तर अशा सर्वांची अतिरिक्त  मिळकत काढून घेऊन ती विकास कामासाठी वापरावी . त्यासाठी अतिरिक्त मिळकत म्हणजे
नक्की काय , हे ठरवावे लागेल. परंतु योजना कुठलीही असली तरी राष्ट्राचा विचार जोपर्यंत आपल्याकडून केला जात नाही तोपर्यंत उपयोगी
ठरणार नाही. तसे तर कायदे नियम भरपूर आहेत की. पण त्यांना कोण घाबरतो ? तशीही कुंपणाने शेत खाण्याची आपल्याला सवय झाली आहेच.  लेख चांगला आहे. विचार करणं आवश्यक आहे हेच खरं.