(१)"नियम माहित असून न पाळणारे आपण भारतीय कुठल्या नव्या लोकपालाला भीक घालू हे संभवत नाही." म्हणून.  या  तर्काने भारतातील सगळेच कायदे रद्द करावेत.
(२) "एकांगीर्‍हटवादी-मेरे मुर्गीकी एकही टांगवादी लोकांना दुसरा उपाय सुचवून काय फायदा?" अगदी बरोब्बर.  पण आपल्यापैकी एकाला दोन टांगा नसाव्यात? "
(३) "जितके लोक आज अण्णांच्या पाठीशी दिसतात, त्यांनी विधेयकाचा मसुदा तरी वाचला आहे का? घटना वाचणे तर दूरच. "आम्ही म्हणू तसाच कायदा झाला पाहिजे" हे विवेकीपणाचे लक्षण नव्हे. त्यांच्या विधेयकाला शेकडो अंगाने विरोध करता येईल. पण त्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
तुम्ही मसुदा वाचला आहेत? आणि घटना? उत्तर होकारार्थी असेल तर जरूर स्वतंत्र लेख लिहावा. विरोधाची शेकडो अंगे आम्हालाही दाखवावीत. पण मला वाटते की, अंडे सडके आहे हे सांगायला अंडे घालावे लागत नाही.