शुद्ध मराठी, कृपया गैरसमज करू नका. पहिल्या मुद्यातील तुमचा तर्क बरोबर नाही. सध्या जे भरपूर कायदे आहेत, ते सक्षम आहेत. अजून नव्या कायद्याची विशेष गरज नाही. आज जी माणसे कायदे राबवतात आहेत तीच माणसे उद्या नवीन जनलोकपाल कायदाही राबवतील. दुसऱ्या ग्रहाहून माणसे यायची नाहीत.

दुसऱ्या मुद्यात "आम्ही म्हणू तोच कायदा करा" असे लोकशाहीत म्हणता येत नाही म्हणून असे म्हणणाऱ्या लोकांना सांगून काय उपयोग, असे माझे म्हणणे आहे.

भरपूर लोक त्यांच्या पाठीशी आहेत याचा अर्थ त्यांचे बरोबरच आहे असा होत नाही. मनोरुग्णांना बाबा म्हणून त्यांच्या मागेही लोक जातात/लागतात. हातातून सोन्याची चेन आणि अंगारा काढणाऱ्या सत्य साई बाबांच्या मागेही लोक असतात. तेव्हा लोकांच्या भावना भडकावून कायदे करून घेतल्याने काही साध्य होणार नाही. याऊलट लोकांना चांगेल नीतिमत्तापूर्वक वागायला सांगावे. जेवढे लोक आता अण्णांच्या भोवताली जमले आहेत त्यांना तरी सांगावे, "आहेत ते कायदे मोडू नका, कोणालाही लाच देवू नका" बराच भ्रष्टाचार कमी होईल. माझ्या मताबद्दल कृपया गैरसमज करून घेवू नका. जनलोकपाल विधेयकावर लवकरच लिहितो. धन्यवाद....