हा एक सध्याच्या काळातील सर्वसाधारण अनुभव आहे! नव्या व्यक्तीला नवं,चांगलं काही करू देण्याच्या आड येणं ही व्रुत्ती आज सगळीकडे दिसते. 'आम्ही एवढी वर्षं इथे काय मजा मारतोय कां? " असा काहिसा सूर 'ज्येष्ठ' लावतात. तुमच्या बाबतीत तर त्यांच्याकडील काम काढून तुम्हाला दिलं. अशा व्यक्तींचा आणखी एक स्वभाव असा असतो की चांगल्याचं श्रेय घ्यायला ते सदैव पुढे असतात मात्र विपरित काही घडलं की मात्र दोष दुसऱ्यावर ढकलायचा!
मीही नवीन यांच्या म्हणण्याशी सहमत आहे. ते असं वागले म्हणून तुम्ही निराश होऊन जाण्याची काहीच आवश्यकता नाहि. आपलं काम चोख करणे, दुसऱ्यांनी विनंती केल्यास त्यांना मदत देणे यात खंड पाडण्याचं कारण नाही. आपण चांगलं करतोय ह्याबद्दल तुमची खात्री आहे नां मग झालं तर!