भ्रष्टाचाराचे मूळ मानवी मनात आहे. माणसाचे सहा मूळ विकार सर्वपरिचित आहेत. त्यापैकी लोभ आणि मोह या विकारातून आर्थिक भ्रष्टाचार निर्माण होतो. जनलोकपालबील अत्यावश्यकच आहे ते या मूळ विकारांवर समाजाचा धाक असावा यासाठी. या बिलामुळे भ्रष्टाचार नष्ट झाला नाही तरी लोक सतर्क राहिले तर त्यावर बरेच नियंत्रण येईल. भ्रष्टाचार पूर्ण आटोक्यात येऊ शकणार नाही हे खरे असले तरी हा कायदा होण्यासाठी सर्वांनी संपूर्ण पाठबळ दिले पाहिजे. समाजातील हिंसा नाहीशी होणार नाही असे म्हणून आपण खुनी माणसाला फाशी देण्याचा कायदा करू नये असे म्हणतो का?