शिक्षणानी विचार तयार केले आहेत, पण आचारण अथवा व्यवहार्यतेचा मुद्दा हेतुपुरस्सर बाजूला ठेवला जातो. म्हणूनच स्वतःला सुशिक्षित
म्हणवणारे लोक नुसतेच शिक्षित आहेत, पण आचरणाने मात्र कधी कधी अशिक्षित माणसासारखे वागतात. म्हणून आपल्यासारख्या संवेदनाशील
माणसाला हा प्रश्न पडला असावा. बोले तैसा चाले , हे फक्त संतांनी आचरणात आणण्याचे तत्त्व आहे , अशी आपली समजूंत आहे. पण आपण साधी
साधी वचनं मोडतो तेव्हा आपल्याला त्याचं काही वाटत नाही. तुम्ही म्हणता ती गोष्ट तर फार पुढची आहे. आचरणात आणणारा बावळट आणि
गांवढळ ठरतो. साधं दुसऱ्या वर्गाचा लोकल प्रवास करून पाहावा. सगळे लोक शिकलेले असूनही कसे वागतात, त्याचे वर्णन माझ्या "दुसऱ्या
वर्गाच्या लोकलच्या डब्यातून सुखाने कसा प्रवास कराल " या लेखात मी केलं आहे ते पाहावे. असे कितीतरी प्रकार आहेत. यावर नक्की उपाय
शोधणं कठीण आहे, कारण माणसाला सुधारावं असं स्वतःला कधीच वाटत नाही, आणि पर्यायाने तो तसा वागतही नाही.