मराठी विश्वकोश आता डिजिटल स्वरूपात युनिकोड मध्ये ३० सप्टेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. हा विश्वकोश
वेबसाइटच्या स्वरुपात प्रसिद्ध होणार असल्यामुळे जगात कुठेही बसून तो विनामूल्य पाहता येईल, असे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी ‘ महाराष्ट्र टाइम्स ’ ला सांगितले.

विश्वकोशाचा संपूर्ण पहिला खंड ३० सप्टेंबर पासून ऑनलाइन पाहता येईल. त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक या प्रमाणे टप्प्याटप्प्याने अन्य खंड वेबसाइटवर उपलब्ध केले जातील, असेही विजया वाड यांनी सांगितले. राज्य सरकार, सी-डॅक आणि मराठी विश्वकोश संयुक्तपणे हा प्रकल्प राबवत असल्याची माहिती त्यांनी दिली. ...
संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स. संपूर्ण मजकूर येथे आहे : मराठी विश्वकोश आता युनिकोडमध्ये!