आता ध्रुवपदाचे भाषांतरः
हे शशिसम उज्ज्वल आनन - कुंतल चमकत जणु कांचन
हे पुष्करवत नीलनयन - जणु गुपित दडे त्यांत गहन१,२
करु काय प्रशंसा त्याची - ज्याने तुला घडविले ।ध्रु।
टीपाः
१. आनन् कांचन् नयन् गहन् असा उच्चार करावा. (अर्थात चालीत म्हणताना हे लक्षात येईलच म्हणा)
२. या ओळींत लघु अक्षरे खूप आहेत म्हणून एखादवेळेस म्हणायला अवघड वाटेल. तसे झाले तर ह्या सोप्या ओळी बघाव्या.
चंद्रासम उज्ज्वल आनन - केसांचा रंगहि कांचन
हे निळे तळ्यासम डोळे - जणु गूज दडे त्यांत गहन ...
इतर सदस्यांची भाषांतरेः
मिलिंद फणसेः
हे उजळ वदन चंद्रासम, ही सोनेरी कचश्रेणी
गुज गहिरे ज्यांच्या ठायी हे नील नेत्र पुष्करिणी
गुण गावे किति मी त्याचे ज्याने तुला घडविले
(गुण गावे किति मी त्याचे ... हे भाषांतर तर केवळ उच्च आहे. )
प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे. आधीच आभार.