माधव,

इंग्रज नसते तर मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारतावर हुकूमत गाजवली असती असा साधारण अंदाज आहे. कारण शिवाजी महाराजां नंतर पेशव्यांनी मराठा राज्य अटकेपार नेले पण ते पुढे चालवणारे कोणी नसल्याने खिळखिळे झाले असते.

शिवाजी महाराजांच्या पश्चात पेशव्यांनी अटकेपार झेंडे रोवले ते कशाच्या जोरावर? तलवार आणि राजकारणाच्या जोरावर.
दिल्लीच्या राज सिंहासनावर कोणी बसावे याचा निर्णय ही पेशवे करीत होते. कशाच्या जोरावर? तलवार आणि राजकारणाच्या जोरावर.
उत्तरेत औरंगझेबानंतर आणि दक्षिणेत टीपू सुलतात नंतर मराठ्यांना प्रबळ शत्रूच नव्हता.
इंग्रजांनी पेशवाईतील 'नाराज' सरदारांना/ओहोदेदारांना हाताशी धरून पेशवाई पोखरली.
शेवटच्या बाजीरावाच्या राशीला इंग्रज लागला नसता तर इतिहास कदाचीत वेगळा लिहीला गेला असता.
शेवटी शिंदे/होळकरांच्या मारामाऱ्या, वतन अणि वारशांचे प्रश्न, राघोबा दादांचे इंग्रजांच्या पदरी जाणे आदी अनेक कारणे आहेत पेशवाईच्या ऱ्हासाला. पण 'इंग्रज' हा मुख्य शत्रू.
मला वाटतं इंग्रज नसते आले तर उत्तरेत शिंदे-होळकर अधिक प्रबळ, आर्थिकरित्या स्वतंत्र आणि पेशवाईला त्यांच्या तंत्रानुसार 'आकार' देणारे ठरले असते.
कोल्हापूरचे, साताऱ्याचे आणि नागपूरचे 'छत्रपती' यांच्यात सत्तेसाठी समझोते झाले असते. मराठी राज्य 'कदाचीत' विभागले गेले असते .....पण टिकले असते.