MS Word मध्ये एखादे लेखन करीत असता ठराविक काळा नंतर 'तो पर्यंत झालेले' लेखन स्वनियंत्रितरित्या साठवले जाते. (Automatic Saving) परंतु आपल्या 'मनोगतावर' दुर्दैवाने तशी कांही व्यवस्था नाही. तसेच नुसते 'सेव्ह' वर टीचकी मारून म्याटर सेव्ह होत नाही. आधी, 'सुपूर्त करण्याआधी वाचून पाहा' वर टीचकी मारावी लागते, त्या नंतर 'सुपूर्त करा' वर टीचकी मारावी लागते, इथे 'तो पर्यंत' झालेले लेखन 'साठवले' जाते. त्या नंतर 'ताजे लेखन' मध्ये जाऊन 'ते' लेखन टीचकी मारून उघडावे लागते, तिथे 'संपादन करा' वर टीचकी मारावी लागते. अशा प्रकारे म्याटर पुन्हा उघडून, लेखन पुढे चालू करता येते. उफ्ऽऽऽऽऽऽऽ. दर १०-१२ ओळींनंतर ही प्रक्रिया सारखी सारखी करत राहायची शक्य होत नाही. लेखन-साखळी तुटते.
त्या पेक्षा, 'लेखन करावे' मध्ये लेखन करीत असता दर १०-१२ ओळींनंतर 'स्वनियंत्रित साठवण' व्हावी अथवा 'सुपूर्त करा' एवढी एकच कळ उपलब्ध करुन त्यावर टीचकी मारता 'तो पर्यंत'चे लेखन 'साठवले' जाऊन, फलक तसाच पुढील लेखनासाठी उपलब्ध राहावा, अशी माझी नम्र विनंती आहे.
धन्यवाद.