ब्रिटानिका हा माहितीकोशदेखील आंतरजालावर उपलब्ध नाही, तर मराठी विश्वकोश का असावा?  अर्थात या दोघांत फरक आहे, ब्रिटानिका खासगी संस्था प्रसिद्ध करते तर, मराठी विश्वकोश सरकार.  पण लिहायला आणि छापायला दोघांनाही  जो भरपूर खर्च येतो, तो निदान अंशतः भरून निघण्यासाठी  छापील खंड हवेत.   शिवाय पुस्तक हातात घेऊन वाचण्याते जे सुख असते ते संगणकावर मिळत नाही.   पुस्तकातील एक पान उघडले की हव्या असलेल्या माहितीखेरीज मूळ विषयाशी संबंध नसलेली पण अन्य रसप्रद माहिती वाचायला मिळते. आंतरजालावर हे सुख नाही. म्हणूनच आज आंतरजालावर कितीही शब्दकोश असले तरी छापील शब्दकोशांचे महत्त्व कायम आहे.

आजही मराठी विश्वकोशाच्या सिड्या आहेतच, पण त्यातून मजकूर शोधायला भरपूर वेळ लागतो.

आणि विश्वकोश विकत घेतला की त्याचे खंड कपाटात बंद का असतील?  एखादा खंड मेजावर, किंवा चहापानाच्या चौरंगावर असला की  दिवसातून एकदातरी चाळला जातो आणि मग अधिक माहितीसाठी दुसरा एखादा खंड बाहेर येतो, असा माझा अनुभव आहे.