इंग्रजांनी काही विद्यापीठे उभारलेली का? माझ्यामते नाही. शाळा आणि महाविद्यालये उभारून नोकरदार वर्ग निर्माण करणे आणि धर्माचा प्रचार करणे हा तर निव्वळ स्वार्थ झाला. खरा सुधारणांचा वेग तर संशोधनाने येतो. त्यामुळे याचेही श्रेय त्यांना देणे कठीण.
या सुधारणांसाठी आर्थिक, राजकीय अन् सामाजिक स्थैर्य यावे लागते. इंग्रज नसते तर असे स्थैर्य यायला किती काळ जावा लागला असता माहित नाही.
भारताने सुमारे ७०० वर्षे मुस्लिमांची राजवट सहन केली. तेव्हा स्वातंत्र्य लढे झाले नाहीत का? (मराठी राज्य वगळता)
अजून एक प्रश्न - बराचसा असंबद्ध - पण उजळ कांतीविषयी असणारे बहुसंख्य भारतीयांचे प्रेम हे इंग्रजांच्या गुलामगिरीचा परिणाम आहे की याचा इतिहास आर्य द्रविड वगैरे पर्यंत जातो?
ॐ