संजय,
तुम्ही म्हणता तसा अनिवार्यतेचा अभाव मुळातच येणार कुठून हा महत्त्वाचा प्रश्न नाही का?समजा मी ऑफिसात गेलो, कामाला सुरुवात केली. तास दोन तास एकदम मन लावून काम झालं. मग तुम्ही म्हणता तसा ब्रेक घेतला. ब्रेक घेऊन आल्यावर मला वाटलं, बास झालं राव. आता कामात मजा येत नाही! पुन्हा मूड लागेल तेव्हा करू. आता अर्धा तास नेट सर्फिग करू. मग त्यानंतर वाटलं, चला बाहेर जाऊन काही तरी खाऊन येऊ. मग वाटलं, चला जरा टेबल टेनिस खेळू. मग लक्षात आलं की, अरे आज एक प्रोजेक्ट मिटींग आहे. पण म्हटलं, जाऊ दे ना... आज काही मूड नाही. मग जरा गाणी ऐकत बसलो. पुन्हा थोड्या वेळाने मूड लागला कामाचा. केला अर्धा तास थोडं काम.
आता माझा बॉस मला किती काळ सहन करेल असं तुम्हाला वाटतं? माझी कंपनी किती काळ पगार देईल मला? बरेच मुद्दे होते. पण एक उदाहरण देऊन थांबतो. तुमचे उत्तर वाचून समाधान झाले नाहीच तर मांडतो.
धन्यवाद. :)