१. भास्कर माहाशय,
गूगल मराठी मध्ये वापरता येते. त्याची "लिंक" ही:
http://www.google.co.in/ बरेच काम उर्वरीत आहे. जमल्यास सर्वांनी यात भाग घ्यावा. हिन्दी व संस्कृत भाषांमध्ये ही अनुवाद चालू आहे.
आपण सुचविल्या प्रमाणे "कंठलंगोट" या शब्दाचा संदर्भ काहीही असो, पण जो शब्द / वस्तु / वस्त्र आपल्या भाषेच्या / पोषाखाच्या व्यतिरिक्त आहे, त्याचे नाव बदलण्याचा अट्टाहास कशासाठी!? मग मुंबईला बम्बई / बॉम्बे म्हाणायला विरोध का?
२. श्री. प्रवासी,
आपल्या "मेल" वरून असे समजते की आपण मराठी मध्ये गूगल वापरले आहे. "आलिया भोगासी" हे भाषांतर फारच सुंदर आहे. पण कोणी केले हे मला ठाउक नाही. याचे कारण कोणीही या उपक्रमात भाग घेऊ शकतो. त्यासाठी एक गूगल वर "खाते" असण्याची आवश्यकता असते. अधिक माहिती साठी ही "लिंक" पडताळून पहावी.
http://www.google.com/language_tools?hl=en
या "लिंक"वर, "Use the Google Interface in Your Language" या शिर्षकाखाली आपणास योग्य "लिंक" मिळेल.
इथे बरेच पर्यायी शब्द आढळले. परंतु
१. एकाच इंग्रजी शब्दासाठी बरेच पर्यायी शब्द पुढे आल्यास निर्णय कसा घेणार?
२. चढवणे (अपलोड), उतरवीणे (डाउनलोड) या इंग्रजी संज्ञाच जास्त योग्य वाटतात.
श्री. नरेंद्र गोळे मला आपल्या "आपण योग्य स्थळी विराजमान दिसता." या वाक्याचा उद्देश समजला नाही.
- मंदार
अखेरीस, मी महाशय नाही हो, मी एक साधा सामन्य पुरोगामी (non-कर्मठ) विचारांचा मराठी माणूस आहे.