पहिल्यांदा तुम्ही आता या क्षणी करत असलेल्या कामात रस घ्या. कम टू द प्रेझंट, दॅट इज प्रायमरी. जर तुम्ही वर्तमानात स्थिर होऊ शकला नाहीत तर कोणतंही काम करतांना तुमच्या मनात दुसऱ्या कामाचे, खेळाचे, वादनाचे विचार येतील आणि जेव्हा तुम्ही टेबल टेनीस खेळाल तेव्हा ऑफिसच्या कामाचे विचार भंडावतील.

मी सुरुवातीलाच म्हटलंय की रस कामात नाही, तुमच्यात आहे, रस तुम्ही आहात, काम न्यूट्रल आहे! आपला हाच गैरसमज आहे की कामात बदल करून रसनिर्मिती होईल. तुम्ही वावगं वाटून घेऊ नका, याच लॉजिकनी लोकांना वाटतं मजा आपल्या पत्नीत नाही, दुसऱ्या स्त्रीत आहे, परस्त्रीचं दुर्दम्य आकर्षण त्यामुळेच तर आहे, पण ते खोटंय. आपल्याला आहे त्या प्रसंगात, आहे त्या कामात, आहे त्या रिलेशनमध्ये रस निर्माण करायचांय.

काय आहे ही रस निर्मितीची कला? तर तीन गोष्टी आहेत :

प्रथम संपूर्ण वर्तमानात या, तुम्हाला आहे त्या जागेवरून हालण्याचा जो विचार सतावतोयं त्याच्याकडे दुर्लक्ष करा, विचारांचा गलका थांबून तुम्हाला एकदम स्वस्थ वाटायला लागेल. तुमची नजर स्पष्ट होईल आणि ऐकणं, जे एका रेडीओवर दोन स्टेशन्स लागल्या सारखं झालं होतं, ते बंद होऊन आजूबाजूचे आवाज नीट ऐकू येऊ लागतील. 

दुसरी स्टेप, आता काम काय आहे ते नीट पाहा. या संपूर्ण कामाचा जाणीवेत एक पक्का प्लॅन तयार करा, ही स्टेप, मग ती स्टेप, नंतर ती स्टेप; तुम्हाला झेपेल तेवढा. हा प्लॅन करताना विचारांना टेकोव्हर करू देऊ नका कारण प्रत्येक विचार विरोधी विचार घेऊन येतो. तुम्हाला सांगीतलंय की पॉझीटीव विचार करा ते चुकीचंय कारण प्रत्येक विचार मग तो पॉझीटीव असो की नेगटीव आपल्या बरोबर विरूद्धचा विचार घेऊन येतो आणि पुन्हा तुमची चित्तदशा अस्थिर होते. प्रथम जास्तीत जास्त तीन ते चार स्टेप्सच घ्या आणि त्या पूर्णपणे कंप्लीट करा. तुम्हाला स्पीड कमी झाला असं वाटेल पण काम इंटरेस्टींग वाटायला लागेल. एकदा तुम्हाला ही सावधपणे काम करण्याची, म्हणजे विचारांना टेकओव्हर न करू देता काम करण्याची, मजा कळली तुम्हाला कामात रस वाटायला लागेल.

तिसरी स्टेप, एका क्षणी जेव्हा तुमचे विचार आणि शरीर अत्यंत समन्वयानी काम करत असतील, म्हणजे इकडे विचार की तिकडे कृत्य  तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण काम करत नाही आहोत! काम शरीर आणि विचार या लेवलवर होतंय आणि आपल्याला फक्त कळतंय, या स्थितीला साक्षी म्हटलंय. हा साक्षी या जीवनातला रस आहे, तो काम रसमय करतो, ट्राय!

प्रथम हे साधा, फार दुर्लभ आहे, मग तुमचा अनुभव कळवा नंतर मी 'ऑप्शन नॉट टू वर्क' काय आहे त्यावर नक्की लिहिन.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

संजय