हा तर  "हियर ऍड नाउ " चा प्रयोग झाला. ही अवस्था आणता येते. पण काही सेकंद अथवा मिनिटंच टिकते. मनाला भराऱ्या मारायला आवडतात,
हेच खरं  माझ्या मते कामात रस घेतला की ही अवस्था मन आपोआप आणते. नेहेमीच असं होईल असं नाही. कामावर एकाग्रता करणं म्हणजे
कामाचे सगळे तपशील काम पूर्ण होईपर्यंत लक्षात ठेवणं असं असावं. हियर  अअँड नाउ ही स्थिती कायम राहणं शक्य नाही कारण क्षणोक्षणी
सभोवतालची सृष्टी सारखी बदलत असते,(आपण त्याची दखल घेत नाही, त्याला काय करणार ) मग मन तरी त्याला अपवाद कसे असेल ? तरीही ही स्थिती अधून मधून बलपूर्वक  आणणं आवश्यक
आहे. त्याचे फायदे म्हणजे ताण रहित जगणं करता येतं. याचा अनुभव कमी का होईना , पण मी घेतला आहे. भावनांमुळे आपण ही स्थिती
फार काळ धरून ठेऊ शकत नाही. भावना प्रत्येक माणसाच्या पूर्वायुष्य कसं गेलय व तो त्याला किती महत्त्व देतो यावर अवलंबून असतं , असं
मला तरी वाटतं. असो. हा विषय तुमच्यासारखाच माणूस लिहू शकतो. लेख चांगला आहे. पण अद्नेय म्हणणंही पटतं. आपण योग्य गोष्टी
सतत करीत नसल्यामुळे , बहुतेक सगळे सिद्धांत खोटे ठरत असावेत.