इंग्रजांनी काही विद्यापीठे उभारलेली का? माझ्यामते नाही. शाळा आणि महाविद्यालये उभारून नोकरदार वर्ग निर्माण करणे आणि धर्माचा प्रचार करणे हा तर निव्वळ स्वार्थ झाला. खरा सुधारणांचा वेग तर संशोधनाने येतो. त्यामुळे याचेही श्रेय त्यांना देणे कठीण.
मुद्दा एकदम मान्य.
===
माहिती-
पुण्याचे शासकीय अभियांत्रिकी महविद्यालय (COEP) हे १८५४ साली स्थापन करण्यात आले. पण सुरुवातीला स्थापत्य आणि यंत्र यांचे फक्त परवाने (लायसंस) देण्यासाठीच हे उघडण्यात आले होते. कोणत्याही प्रकारचे संशोधन होत नसावे असे दिसते.