आपण सतत कार्मोन्मुख असल्यानी जाणीवेचा फोकस स्वत:प्रत येतच नाही हे अस्वस्थतेचं खरं कारण आहे आणि तोच या लेखाचा उद्देश आहे.

हिअर अँड नाऊ म्हणजे आपण स्वत:! तुम्ही नीट समाजून घ्या, काल हा भास आहे त्यामुळे वर्तमान असं सुद्धा काही नाही, तो फक्त निर्देश आहे आणि त्याचा अर्थ आहे विचारचक्रातून बाहेर या. जसं आगगाडीतून बाहेर पाहिल्यावर आपल्याला बाहेरची दृश्य हालतायंत असं वाटतं तशी आपली स्थिती आहे. सतत हालणाऱ्याच गोष्टींशी संपर्क आल्यानी मग ती शरीराची धवपळ असो, क्रिकेटचा सामना असो, टीवी सिरियल असो की नुसतं स्वस्थं बसल्यावर देखील सुरू असणारे विचार आणि भावनांचे आवेग असोत, आपल्याला असं वाटतंय की आपणच हालतोयं! आपण कधीही हालत नाही, कितीही ठरवलं आणि प्रयत्न केला तरी हालू शकत नाही कारण आपण स्थिती आहोत, व्यक्ती नाही! हाच तर आध्यात्मिक उलगडा जीवनाचे सगळे रंग बदलून टाकतो, हीच तर आध्यात्माची खुमारी आहे, म्हणून तर माझं लेखन तुम्हाला आवडतं. काय असेल कारण हे लेखन तुम्हाला आवडण्याचं? इट ब्रिंग्ज यू इन टू द हिअर अँड नाऊ! इट सिंप्ली कनेक्टस यू टू योरसेल्फ. काय फायदा आहे याचा? एकदम सरळ आहे, तुम्ही साक्षी होता आणि काम रंगतदार होत! फक्त समजायचा अवकाश की झालं काम!

भूतकाळ, भविष्यकाळ, कामात बदल, नात्यात बदल, स्वत:त बदल, परिस्थितीत बदल, नियतीत बदल, काही म्हणता काही करायची गरज नाही, जमलं?

संजय