संजयजी,
बऱ्याच दिवसांनी प्रतिक्रिया देत आहे.
मी काय कितीही लेखन करीन पण तुमच्या बाजूने या सुखनैव मिळणाऱ्या ज्ञानाचा काय उपयोग झाला ती उत्सुकता आहे. ==>
सुखनैव मिळाल्यामुळे, आयते मिळाल्यामुळे, हे ज्ञान नाही, तर माझ्यासाठी फक्त "माहिती" आहे आणि जितकी जास्त माहिती (ज्ञान नव्हे) मिळतीये, तितका मी अजूनच विचारांच्या पिंजऱ्यात अडकत जातो आहे, असे मला वाटते.
भाषा "बोलता" येणे ही पाहिली पायरी आहे, त्यानंतरच व्याकरणाच्या अंगाने तिचे विश्लेषण करणे आणि समजणे शक्य आहे. कर्ता आधी की कर्म की क्रियापद ? ..हे असे आहे , ते तसे पाहिजे असे "तेव्हाच" समजते,जेव्हा भाषा यायला लागते.
दुचाकी गाडी चालवायला शिकण्यासाठी,गाडीवर स्वतः बसूनच ती चालवण्याचा सराव करावा लागतो.तोल सांभाळावा लागत नाही तर तो आपोआप कसा सांभाळला जातो हे शिकवता येत नाही तर ते स्वतःचे स्वतःच अनुभवावे लागते आणि "तेव्हाच" कळते.त्याआधी असे कितीही सांगितले की तोल आपोआप सांभाळला जातो, तुम्हाला काहीही करावे लागत नाही (ऊ.निराकाराचा बोध ) तरी ते कळणे केवळ अशक्य !
असो. नेहमीप्रमाणे तुमचे अप्रतीम लिखाण वाचताना "विचार" करायला नवीन पैलू मिळतो ! अर्थात त्यामुळे, तुमचा लेख वाचल्यानंतर विचार कमी होण्याऐवजी वाढतात :-)