"विचार" करायला नवीन पैलू मिळतो! अर्थात त्यामुळे, तुमचा लेख वाचल्यानंतर विचार कमी होण्याऐवजी वाढतात:

मी समजलो नाही. मला तुमची विचार करण्याची पद्धत कळेल का?

"कार्योन्मुखता म्हणजे सदैव काही तरी करावं किंवा किमान ‘काही तरी घडावं’ ही मानसिकता! हे असं सततचं वाटत राहणं म्हणजे निष्कारण गाडी गिअरमध्ये टाकून ठेवण्यासारखं आहे."

हा बेसिक थ्रेड आहे. तुम्ही हे वाचल्यावर तुमचे काय विचार सुरू झाले?

किंवा हा या लेखाचा कोअर पार्ट आहे :

 "कोणत्याही कर्माचं साधन शरीर आहे ही उघड गोष्ट आहे आणि मन म्हणजे मेंदूत साठवलेली सर्व माहिती, तुमची कार्यपद्धती, तुमचं कार्यकौशल्य आणि तुमचा कामाविषयीचा दृष्टिकोन ही सर्व सहसाधनं आहेत, या दोन्हीच्या समन्वयानं कोणतंही काम पूर्ण होतं. आता कोणत्याही कामात आपला सहभाग न्यूट्रल गिअर सारखा असतो, हा न्यूट्रल गिअर कामातली विश्रांती आहे."

याचा तुम्ही काय अर्थ घेतलात?

तुमचे विचार कशामुळे आणि कोणत्या दिशेनी सुरू होतात हे कळलं तर मला उत्तर देता येईल.

संजय