पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण (भान) ठेवावं लागतं तर ती गोष्ट integrate होते , पेशन्स लागतात असा माझा अनुभव ...
येस! पण पटणं महत्त्वाचं आहे. मी नुसता सिद्धांत मांडून तुमच्यावर प्रयोग करत असतो तर गोष्ट वेगळी, मी माझ्या यशस्वी प्रयोगाचे निष्कर्श तुमच्याशी शेअर करतोयं.
स्टारमाझावर प्रथम पारितोषिक विजेत्या एका ब्लॉगरनी हार्डडिस्क फ्रॅग्मेंटेशन विषयी लिहिलं होतं, त्यानी बिनधास्तपणे करून पाहा तुमचा कंप्युटर इफिशियंट होईल वगैरे म्हटलं होतं. एकानी त्याला फ्रॅग्मेंटेशन दरम्यान वीज गेल्यास नक्की किती पॉवर बॅक-अप लागेल विचारल्यावर त्यानी सांगितलं 'हे माझ्या मित्रानी मला सांगितलंय, मी माझी हार्डडिस्क फ्रॅगमेंट करून बघितलेली नाही! आता बोला!
मी जे सांगतो ते जगतो. पैसाही मानवी कल्पना आहे हे लक्षात आल्या क्षणापासून माझ्या जीवनातली सर्व धावपळ संपली, कधीही पैश्यासाठी कोणतंही काम केलं नाही, तो पॉइंट ऑफ रेफरन्सच राहिला नाही. मी त्या ऐवजी आनंद ही जीवनाची दिशा केली त्यामुळे मी जगातला सर्वात संपन्न माणूस झालो कारण मी प्रथम आणि पैसा दुय्यम झाला. माझ्या जीवनातला उद्या व्यर्थ झाला. मी कधीही जाग आल्याशिवाय उठत नाही.
आता तुम्हाला हे पटेल पण तुम्ही रिस्क घेणार नाही. मग कसा गवसणार तुम्हाला स्वच्छंद? मग कशी जाणार तुमच्या जीवनातली कार्यानिवार्यता? मी पैसा मिळवू नका म्हणत नाहीये, तुम्ही प्रथम आहात, पैसा दुय्यम आहे हे सांगतोयं आणि फायनान्स हा माझा व्यावसाय असून सांगतोयं.
आता तुम्हाला पटेल किंवा मग तुम्ही विचारात पडाल ते सर्वस्वी तुमच्यावर आहे आणि जेवढे विचारात पडाल तेव्हढा मनाचा पगडा वाढत जाईल आणि तुम्ही दुय्यम होत रहाल.
संजय