संजयजी,
मला असे म्हणायचे आहे की तुमचा लेख वाचल्यानंतर तुम्ही लेखात लिहिलेल्या गाभ्यानुसार त्याचा अर्थ लावण्याची, समजून घेण्याची प्रक्रिया मनात सुरू होते. त्याचे विश्लेषण सुरू होते व नंतर बराच काळ, बरेच दिवसही अनेकदा अधून मधून वाचलेलं आठवत राहतं आणि मन त्याच्या विश्लेषणात रमतं. ह्याअर्थी मी विचार वाढतात असे म्हटले होते, आणि पुढे स्मायली टाकला होता पण तो उमटला नाही. गैरसमज नसावा.
"कार्योन्मुखता .... ठेवण्यासारखं आहे. "
हा बेसिक थ्रेड आहे. तुम्ही हे वाचल्यावर तुमचे काय विचार सुरू झाले? >
सांगतो.उदा. सदर लिखाण वाचल्यानंतर "काहीतरी घडावं, असं खरंच सदैव वाटतं का? " याचा विचार सुरू होतो. मग तो विचार भरकटत जातो. पुन्हा मध्येच लक्षात येते की अरे आपण तर अमुक अमुक विचार करत होतो. प्रामाणिकपणे सांगतो की अजूनतरी मला विचारांकडे त्रयस्तपणे पाहता आलेले नाही. त्यामुळे दोन विचारांमधला अवकाश मला अद्याप लक्षात आलेला नाही. विचारांकडे पाहणे हाही माझ्याद्रुष्टीने एक विचारंच सुरू होतो. विचार न करता विचारांकडे कसं पाहायचं हे मला जमत नाही, किंबहुना समजलेलंच नाही.
वेळ हा भास आहे > पूर्वीच्या लेखात मी प्रथमतः हा विचार वाचल्यानंतर खूपच उत्तेजित झालो. काहीतरी नवीन हाती लागल्याचा आनंद झाला. हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो. हा प्रयत्न म्हणजे मनाच्या पातळीवर, विचार करून समजून घ्यायचा प्रयत्न, जसे आपण एखाद्या गणिताची विचारपूर्वक उकल करतो तसे. पण त्याची उकल काही होत नाही व वेळ हा भास आहे हे तांत्रिक दृष्ट्या कळूनही त्याचा काहीच उपयोग होत नाही. (म्हणजे वेळेची जाणीव आहे तशीच राहते)
असेच प्रत्येक बाबतीत घडते.समजते पण आकलन होत नाही.
मग स्वतःचं आकलन जीवनातल्या एकेका प्रसंगावर वापरून बघत गेलो आणि मग मला जो उलगडा झाला तो अंतिम होता. >
मला वाटते, हीच पायरी निर्णायक आहे. सर्वच "बोधी" व्यक्तींनी हेच केलं आहे,पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा! आणि प्रत्येकाने तो स्वतःच शोधलेला वा गवसलेला, पण कॉपी न करता येणारा.त्यामुळेच तुमचा मार्ग माझ्या दृष्टीने फक्त मार्गदर्शक,त्यावर चालून मला बोध येणे केवळ अशक्य..
यू मस्ट राईड द बाइक योरसेल्फ! तोल आपोआप कसा सांभाळला जातो ते स्वतःचे स्वतःच अनुभवावे लागते आणि "तेव्हाच" कळते. त्याआधी असे कितीही सांगितले की तोल आपोआप सांभाळला जातो, तुम्हाला काहीही करावे लागत नाही (ऊ. निराकाराचा बोध ) तरी ते कळणे केवळ अशक्य!
संजयजी,
तुम्ही कसे प्रयोग केले ते सांगितले तर कदाचित काही दिशा मिळेल. जसे "काळ हा भास आहे" ह्याचे आकलन होण्यासाठी काय करावे ? मला व्यक्तिशः तांत्रिकदृष्ट्या हे पटले आहे, पण पूर्ण उलगडा होत नाही. मला वाटते,अशा कुठल्याही एका आकलनाने "लिंक" ओपन होईल व पुढची कनेक्टीव्हीटी मिळेल.सुरुवातीचे "एकच" आकलन होणे आवश्यक आहे.