>>यात शाळेबाहेरील चिंतन व अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी १५ तास दिले आहेत.<< शिक्षकांनी शाळेच्या बाहेर किती तास मनन केले हे कसे व कोण पाहणार?  याचाच अर्थ असा की हे मनन शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्गावर न जाता शाळेत बसून करायचे आहे. परिपत्रकाचा हा अर्थ अपेक्षित नसेल, तर परिपत्रकातील भाषा बदलवून घेण्याचा प्रयत्न करावा.  निष्कारण बंड करून काही फायदा नाही.  घरी नेलेल्या वह्या आणि उत्तरपत्रिका तपासायला लागणारा वेळ, प्रश्नपत्रिका बनवायला लागणारा वेळ, वक्तृत्वस्पर्धेसाठी लिहून द्यावयाची भाषणे तयार करण्यास लागणारा वेळ, शाळेचे वेळापत्रक बनवायला लागणारा वेळ, शाळेत कुठलाही कार्यक्रम चालू असेल तर तो पाहण्या किंवा ऐकण्यासाठी द्यावा लागणारा वेळ, कामासंबंधी मुख्याध्यापकांशी किंवा सहशिक्षकांशी चर्चा करायला लागणारा वेळ, मासिक शुल्क गोळा आणि जमा करणे, शाळेच्या रजिस्टरांमध्ये विविध नोंदी करणे, एस्‌एस्‌सीचा अर्ज भरून घेणे, वार्षिक संमेलनाच्या तयाऱ्या इत्यादींसाठी लागणारा वेळ यांचा विचार सरकार करते की नाही, हे सरकारला  आणि शाळासंचालकांना जरूर विचारावे.