आज मी मराठी विकिपेडीया बघायचे ठरविले. तिथे dictionary हा विषय दिसला. भाषांतराची यादी लांब होती. पण का कुणास ठाऊक "मनोगत" यावर लक्ष गेले आणि मनोगतच्या या संकेतस्थळावर पोचलो. मनोगत मला इतके आवडले की मनोगत वाचनात आणि काही प्रतिसाद देण्यात चार तासावर वेळ कसा गेला हे कळलेच नाही.

मनोगतमध्ये शोध घेण्याची सोय उजवीकडे खाली असल्याने सुरुवातीला दिसली नाही. शोध घेतल्यावर यादी बरोबर आली. पण त्यात पाने किती हे कळले नाही. कुठल्याही एका पानावर जाण्यासाठी एक टिचकीऐवजी मधली पाने ओलांडतं जावे लागले. असे का?

यादीतील एखादी बाब उलगडून बघितल्यावर परत त्याच यादीकडे कसे परत यायचे?

शुद्धलेखन दुरुस्ती ही फारच उपयोगाची सोय आहे (विशेषतः ऱ्हस्व दीर्घ बाबतीत).

मनोगतच्या मुख्य संपादकाला काही सांगायचे असल्यास कुठे लिहावे?

प्रतिसाद देताना साखळी चित्र दिसते. त्याचा वापर कळला नाही. त्यासाठी दाखवलेली माहिती नीटशी समजली नाही.