रविंद्रजी, मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालो आहे. माझ्या सुरवातीच्या दिवसात शिकविण्याला महत्त्व होते व शिक्षकालाही पैसा कमी असला तरी समाजात मान होता. पण निवृत्तीच्या वेळी शिकवणे या बाबींपेक्षा आत व बाहेर चाललेल्या राजकारणाला महत्त्व आले. एका शासकीय संस्थेत ही परिस्थिती तर इतरत्र किती असेल? याला कारण आपणच आहोत. शेवटी संपूर्ण समाजाची दिशा राजा ठरवतो. निवडून दिलेले आपले प्रतिनिधी हे आजचे राजे! आपलेच! त्यामुळे जशी प्रजा तसा राजा! कोण निवडला जाणार हे तुमच्या सारख्यांच्या मतांवर जेव्हां ठरू लागेल तेव्हांच चांगले बदल होतील. तोवर नियम आणि परिपत्रकांच्या जंगलातून मार्ग काढणे एवढेच आपल्या हाती! अण्णांच्या आंदोलनाकडे आपण या बदलाकडे नेणारे पहिले पाऊल असे समजायला हरकत नाही. मार्ग कठीण आणि लांबचा आहे पण योग्य दिशेने नेणारा आहे. - शशिकान्त गोखले