कोणता माणूस कोणत्या परिस्थितीत कसा वागेल हे खरंच सांगता येत नाही. दुसऱ्याला उल्लू बनविण्याचे, लबाडीने वागण्याचे काय सुख मिळते ते माहित नाही. अनेकदा ती व्यक्ती परिस्थितीची शिकार आहे म्हणून सोडून द्यावे अशीही स्थिती नसते. अशा वेळी तो धडा निमूटपणे पचवून पुढील व्यवहारात शहाणे होण्यापलीकडे हातात काही नसते.