भ्रष्ट आचार हा आपल्यातील काम क्रोध इ. सहा शत्रुंमुळे घडत असतो. हे विकार तर मानव जात आहे तोवर नष्ट होणार नाहीत. बलात्काराविरुद्ध कायदा आहे म्हणून निदान ते आटोक्यात आहेत. तरीही बलात्कार होत असतात म्हणून हा कायदाच नको असे कोणी म्हणेल का? जनलोकपाल बद्दल देखील असेच म्हणता येईल. ज्या निर्लाज्जपणे आर्थिक भ्रष्टाचार चाललेला आहे आणि अशांना काही शिक्षा होईल असे कायदे नाहीत म्हणून एक डिटरंट म्हणून अशा कडक कायद्याची जरुरी आहेच. आणि कायदा झाला तरी त्याची अम्मलबजावणी दक्शतेने झाली तरच त्याचा उपयोग! असे असले तरी ही योग्य दिशा आहे आणि आपण सर्वांनी अजून कशात काही नसतांना निराशावादी सूर लावणे बंद केले पाहिजे. अण्णांना आपण संपूर्ण पाठबळ दिले पाहिजे.