अण्णांच्या उपोषणामुळे विधेयकातील तीन महत्त्वाच्या मुद्द्यांना संसदेत सहमती मिळाली आहे, उरलेल्या मुद्द्यांनाही मिळेल.  उपोषणाने प्रश्न सुटतात या  गोष्टीवर आता वस्तुस्थितीचे शिक्कामोर्तब झाले आहे.  यापुढे कुणी उपोषणावर आपली मते व्यक्त करणार नाही!  कुणाला करायचीच असतील तर आधी दुसरा राजकीय मार्ग सुचवावा आणि मगच उपोषणावर टीका करावी. 

स्वयंसुधारणा हा मार्ग नाही.  तो मार्ग शक्य असता तर जगात दुःख, कष्ट, अन्याय, युद्धे वगैरे वगैरे नावाला राहिली नसती.