३२ वा लेख :
>>भवसागराचं पाणी म्हणजे निराकार!
ज्या निराकारानं आख्खं अस्तित्व उद्धरलंय तो आपल्याला उद्धरेल किंबहुना त्यानं आपल्यालाही उद्धरलंय ही कल्पनाच नसल्यामुळे आपण किनारा शोधत शेवटापर्यंत बेतहाशा हातपाय मारत राहतो, तरंगण्याची मजा कधी येतच नाही ...
>> व्यक्तिमत्त्वातून संपूर्ण मोकळीक झालेल्या या अवस्थेतून ‘आता काय करायचं’ ते ठरवा, तुम्ही भवसागरात पोहण्यात वाकबगार व्हाल ...
२रा लेख :
>>अध्यात्म म्हणजे या शांत आणि स्वस्थ निरकाराचा बोध घेऊन आकारात जगणे, मग जीवनात एक निश्चींतता येते कारण काळजी करणाराच कोणी राहत नाही.
म्हणजे व्यक्तिमत्वातून मोकळीक, यालाच तर "शरण येणे" म्हणता येइल ना ?