माणूस काय बोलतो यापेक्षा तो काय वागतो यावरून मी माणूस ओळखतो. दुसऱ्यांदा संधी देतांना त्याला मी त्याची प्रथम झालेली चूक निदर्शनाला आणून देतो, मग तो काय म्हणतो ते पटतंय का ते बघतो आणि त्याला त्याची वर्तणूक सुधारायला सांगतो. यावर पुन्हा तो तसाच वागला तर मी पुन्हा मदत करत नाही.

मला एका गणितज्ञानी सांगीतलेली गोष्ट पटते : आय मेक मेनी मिस्टेक्स मेनी टाईम्स बट आय डोंट मेक द सेम मिस्टेक सेकंड टाईम!

मला सोनटक्के परस्पर निकाल घेऊन गेले हे कळल्यावर मी कुमारला फैलावर घेतलं असतं. मला वाटतं सोनटक्क्याना नाही तर कुमारला ओळखण्यात तुमची चूक झाली. किमान  दुसऱ्या अपिलाला तर मी सोनटक्क्यांना कुमारला घेऊन यायला सांगीतलंच असतं.

> मनात आले, कुमार कशाला येईल? सोनटक्केंचे वागणे त्यालाही न आवडल्याने.

इथे तुमची चूक झाल्यानी पुढचा मनस्ताप झाला!  

संजय