तुम्ही घटना घडणार असेल तर ती घडायला आवश्यक असेल तेवढाच प्रयत्न कराल
किंवा घटना घडणार नसेल तर ती न घडण्यासाठी हवा तितकाच विरोध कराल, ते
करतांना तुमचा स्वत:शी संपर्क तुटणार नाही आणि मग घटना काहीही असो आणि तिचा
परिणाम काहीही होवो, तुम्ही मजेत रहाल!
हे जरा आणखी स्पष्ट कराल का? शक्यतो काही व्यवहारातील उदाहरणे देऊन सांगितले तर समजायला सोपे जाईल.
तसेच वर तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिली पायरी अमलात आणण्याचा प्रयत्न करतोय, पण झेपत नाही!
म्हणजे कामाच्या अपरिहार्यतेमुळेच तर मी मला नेमून दिलेले काम करतोय. त्यामुळे मी तेच काम सतत, मला दिलेल्या डेडलाईन पाळून सातत्याने करणे हे मला मजेशीरपणे करताच येत नाहीये. एवढेच काय तर मला आवडाणाऱ्या गोष्टी सुद्धा काही काळ झाल्यानंतर मला नकोशा होतात. पण किमान त्या केसमध्ये त्याची अपरिहार्यता नसल्याने मी ते हवे तेव्हा बंद करू शकतो. पैसा मिळवून देणाऱ्या कामामध्ये ते सुविधा नाही ना!
एक शंकाः तुम्ही म्हणता तो निराकाराचा बोधच जर मला अजून होत नसेल तर... तुम्ही सांगितलेले उपाय करणे हे तर वाघाचे कातडे पांघरल्यासारखे नाही का होणार?
हा निराकाराचा बोध मला का होत नाही??
मला खराखुरा वाघ व्हायचंय, वाघाचं कातडं नाही पांघरायचं.