विनायककाका,

मुद्दा मान्य. विधान मागे घेतो. पण आता प्रश्न असा पडतो की इंग्रजांचा हेतू काय होता या सगळ्यामागे.

बीई बी ए वगैरेंचे समजू शकतो की हा सरळ सरळ पांढरपेशा कर्मचारी वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न होता. शेवटी एवढे इंग्रज लोक आयात करणे शक्यच नव्हते देशाचा कारभार सांभाळायला.

हाफकिन संस्था कशासाठी उभारली हे सांगणे थोडे कठीण आहे. पण गुलामांचे शोषण हे उद्दिष्ट असल्याने गुलामांचे आरोग्य तितकेच महत्वाचे ठरते. गायीचे आरोग्य सांभाळून दूध विकले तरी गाय गुलामीतच असते. कदाचित इथले रोगराई वेगळी असल्याने वेगळ्या लशींची गरज भासली असेल आणि म्हणून इथे थोडे संशोधन करणे भाग पडले असेल. (कदाचित इंग्रजांची इथल्या रोगांविषयीची भीती पण याला कारण असेल. तसे ते अजूनही खूपच भीतात.)

इंग्रज नसते तर कदाचित साम्यवादी क्रांती झाली असती कारण चीन, रशिया या जवळच्यांचा प्रभाव पडला असता. हा विचार करता आपण कदाचित या संकटातून वाचलोच म्हणायचो.