हे स्वतःला कधी कळायला लागणार सगळं असा विचार येतोय!
उन्मेश, मला ज्या एका गोष्टीचा फार मोठा उपयोग झाला यी सांगतो, आध्यात्मिक साधनेत मी कधीही कुणाकडून इंप्रेस झालो नाही. मी ओशोंना मानलं पण ते काय म्हणतायंत ते पटल्यावर तो आपला अनुभव होतोय का ते बघीतलं. काय झाला असेल याचा परिणाम? मी आज सत्याची मांडणी ओशोंपेक्षा ही सोप्या पद्धतीनं करू शकतो. एकेक मुद्दा समजावून द्यायला त्यांना एकेक तास लागयचा, मला दोन किंवा तीन पॅरेग्राफ पुरेसे होतात. अर्थात त्यामुळे ओशों विषयीची कृतज्ञता यत्किंचतही कमी होत नाही कारण जरी ते माझ्यासाठी काहीही बोलले नाहीत तरी ते बोलले नसते, मला त्यांचं साहित्य उपलब्ध नसतं, आश्रम नसता तर मला सत्य गवसलं नसतं. पण सत्य गवसण्याचं माझं श्रेय मी स्वत:ला देतो कारण मी ओशोंना प्रत्यक्ष कधीही भेटलो नाही, मी माझे अर्थ काढले आणि ते स्वत:च्या जीवनात वापरून पाहिले.
काय झाला असेल मला या मानसिकतेचा उपयोग? तुम्ही जगातला कोणताही आध्यात्मिक गुरू पहा (एकहार्ट सोडून) त्याच्या समोर रेफरन्स असतो, स्वतःचं म्हणणं पटवून द्यायला त्याला ग्रंथांचा आधार लागतो, मान्यवरांचे दाखले द्यावे लागतात, मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाला सरळ उत्तर देतो कारण मी स्थितीतून बोलतो स्मृतीतून नाही. यामुळे मी कुणाशीही आणि कोणत्याही विषयावर मग ते संगीत असो, प्रणय असो, सौंदर्य असो, मृत्यू असो, पैसा असो, नातं असो, रोजचं काम असो की भोजन अत्यंत विधायक संवाद साधू शकतो. मी प्रत्येक संवादात काही तरी सार्थकता आणण्याचा प्रयत्न करतो उगीच माहितीचं अदानप्रदान करत नाही. या संवादात मला देखील काही गवसलं तर मी देणाऱ्याचे धन्यवाद मानतो आणि त्यामुळे नेहमी ओपन असतो.
मी तुमच्यासाठी तिच संधी उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही मला प्रत्यक्षात पहाल, न पहाल पण माझं आकलन मी तुम्हाला बेशर्त देतोय. तुम्ही मी प्रत्यक्षात कसा जगत असेन (म्हणजे लिहितो तसाच जगतो, तरीही) अशी कल्पना करण्याऐवजी माझी सूत्रं तुमच्या जीवनात तुम्हाला कशी उपयोगी होतात ते पाहा. तुम्हाला कोणत्याही क्षणी उलगडा होईल. काय असेल त्याची परिणिती? तुम्ही त्या गवसलेल्या सत्याच्या अनुरोधानी मस्त जगायला लागाल! आध्यात्म सोपं व्हावं, ते सर्वांना सहज उपलब्ध व्हावं म्हणून तर मी लिहितोयं. तुमच्या सत्योपलब्धीचं श्रेय माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त असेल.
संजय
sanjayunlimited@yahoo.com