पण ही शक्यता दिसत असतानासुद्धा इंग्रजांनी आधुनिक शिक्षण सुरू केले हा त्यांचा मोठेपणा.
हे पटत नाही. याला अदूरदृष्टी पण म्हणता येईल. किंवा अजून काही चांगला पर्याय नव्हता हेही कारण असू शकते. भारतात जेवढे औद्योगिकीकरण होईल त्याचा फायदा इंग्रजांनाच होणार होता त्यामुळे त्याला चालना देणे त्यांना भागच होते. त्याचे काही दुष्परिणाम असले तरी.
एक मात्र आहे की इस्लामिक राजवटींपेक्षा त्यांचा दृष्टीकोन खूपच आधुनिक होता आणि प्रचारपद्धती थोडीशी मवाळ. इस्लामिक राजवटींनी तलवारीच्या जोरावर धर्मांतरे करून प्रगतीच्या मार्गात मोठाच अडसर निर्माण केला. धर्मांतरे झाल्यावर शतका दोन शतकातच समाज गोंधळून जातो. इस्लामिक लुटारूंनी आपल्याला लुटले च्या ऐवजी मीच तो इस्लामिक राजवटीचा वारस आणि हा माझा गुलाम प्रदेश असे काहीसे लोकांना वाटायला लागते. आपल्या नशिबाने इंग्रजांनी भारताला इंग्लंड नाही बनवले. (किंवा त्यांना तेवढे शक्य नाही झाले)