तिसरी हायकू आवडली. ('बाणा मराठी'ऐवजी 'बाणा पुणेरी' अधिक समर्पक ठरेल काय? शिवाय ५-७-५लाही कोणतीही बाधा येणार नाही.)
चौथी हायकू तितकीशी समजली नाही. 'त्रस्त कुंपण' ठीक आहे ('त्रस्त कुंपणा'चा अर्थ चांगला समजला), पण देवाचा आणि बगीच्याचा परस्परसंबंध लक्षात आला नाही. (अर्थात, हायकूमध्ये वाचकास हवा तसा अर्थ लावण्यास वाव हवाच म्हणा - निदान असे ऐकलेले आहे - आणि तो कवीला अभिप्रेत अर्थाशी मिळताजुळता असावाच, असेही नाही, असेही ऐकलेले आहे, पण यातून एकंदरीत काहीच संबंध समजला नाही.)
पाचवी हायकू समजली असे वाटते. खात्री नाही.
पहिली आणि दुसरी ठीक, पण तितकीशी 'क्लिक' झाली नाही. (अनभिज्ञ वाचकाचे प्रामाणिक मत. )