योगायोगाने सध्या मी "व्हॉट वेंट राँग?" हे पुस्तक वाचतो आहे. त्यात या चर्चेच्या "इस्लाम-ख्रिश्चन संघर्ष" या भागावर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे.

एक मात्र आहे की इस्लामिक राजवटींपेक्षा त्यांचा दृष्टीकोन खूपच आधुनिक होता आणि प्रचारपद्धती थोडीशी मवाळ.

हा मुद्दा त्या पुस्तकाच्या आधारे खूपच पटण्यासारखा आहे. ७व्या शतकात जेंव्हा नवीन धर्म अस्तित्वात आला तेंव्हा ख्रिश्चन धर्म आणि त्याच्या अधिपत्याखालील प्रदेश आणि लोक तसे मागास आणि क्रूर होते. मध्यपूर्वेतून सर्व व्यापार होत असल्याने सर्व संस्कृतींच्या संकराने त्याकाळातली एक प्रगत संस्कृती तेथे अस्तित्वात होती. पण अनेक कारणाने, त्या संस्कृतीने नवीन गोष्टी आत्मसात करणे सोडून दिले आणि मग आजचे सापेक्ष दृष्टया मागास रूप बघाव्यास मिळते. तसेच पाश्चात्य देशांनी आधुनिक तंत्रज्ञानात जोरदार मुसंडी मारली, आणि पूर्वेकडील (मध्यपूर्वेतील देश वगळून) देशांना स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना ती शिकवली. या सर्व आणि आणखी अनेक कारणांमुळे मध्यपुर्वेसाठी अनेक बाबतीत काळ थांबला. असे त्या पुस्तकाच्या लेखकाचे म्हणणे आहे.
===
या चर्चेशी संदर्भ-
भारतावर इंग्रजांचा अंमल १८व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाला. १९व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली. समजा इंग्रजांचा अंमल न येता तर भारताची औद्योगिक परिस्थिती अफगाणिस्तान पेक्षा वेगळी नसती असे वाटते.