श्री.विनायक.

आज इराकमध्येही, ब्रिटिश-अमेरिकनांनी, इराकी जनतेसाठी लोकोपयोगी अशी काही कामे सुरू केलीच आहेत. त्यांच्या इस्पितळांसाठी आर्थिक मदत, वृत्तपत्रे, आकाशवाणी, रस्त्यांची डागडुजी इ.इ. पण प्रश्न असा पडतो, की ह्यामागे हेतू काय ? लाखोच्या जनसंख्येवर राज्य करायचे असल्यास असली तोंडदेखली लोकाभिमूख कामे ही करावीच लागतात. मात्र ही सर्व कामे हातची राखूनच केली जातात. मूळ उद्देश वेगळेच असतात.

आपण म्हणता ती कामे ब्रिटिशांनी नक्की कोणत्या उद्देशांनी केली असावीत ? भारतीय जनतेची त्यांना खरंच काही काळजी होती की, ही फक्त, आम्ही वाईट नाही हे दाखवून देण्यासाठीची केलेली वरवरची मलमपट्टी होती ? ब्रिटिश जर खरंच इतके चांगले होते, तर त्यांना आपण का बरे हाकलून लावले ? त्यांच्याच शाळा-कॉलेजातून शिक्षण घेऊन पुढे त्यांनाच चलेजाव म्हणणारे टिळक-आगरकर-नेहरू-गांधी हे गद्दारच की !!

ब्रिटिश नसते तरीही, भारतात शाळा-कॉलेज-विद्यापीठे आलीच असती. भारतातला अणूसंशोधन प्रकल्प ब्रिटिशांनी चालू केला होता का ? टाटांचे प्रकल्प आपले भारतीयांचेच होते. सुधारणा व्हायला थोडा वेळ लागला असता. पण ज्या सुधारणा झाल्या असत्या, त्या ह्या मातीतून घडून आल्या असत्या. आपल्यावर सुधारणा लादल्या गेल्या नसत्या.

आपल्याला त्यांच्या कामात मोठेपणा दिसतो, मला मात्र ह्यात त्यांचा स्वार्थ आणी धूर्तपणाच  दिसतो. ब्रिटिशा मनाने मोठे की स्वार्थी-धूर्त आणी कपटी होते ?

मयुरेश वैद्य.