मनोगत.कॉम हे चांगले संकेतस्थळ आहे. पण, हे सार्वजनिक संकेस्थळ असले तर खासगीरीत्या नियंत्रित आहे. यात खासगी नियंत्रणाच्या नकारात्मक बाजू डोकावू नयेत, हे आवश्यक आहे.

मनोगत ही एक चांगली सुरवात आहे. मनोगतसारख्या युनिकोडवर आधारित संकेतस्थळे येणाऱ्या काळात येतीलच. मनोगताचे विशेषता काय असावी यावर चर्चा व्हावी. मनोगताची ख़ासियत काय असावी यावर त्यात खल व्हावे. अन्यता मनोगत कुठल्याही संकेतस्थळासारखे ठरेल. लक्षात राहील. पण कुणी तिथे जाणार नाही.

मनोगतावरून आरएसएस फ़ीड मिळावेत ही देखील माझी इच्छा आहे. माझ्या आरआरएस एग्रिगेटरवर नव्या कविता, नव्या चर्चा, नवे लेख कोणते ते कळावे. असो.

मी अनेक सूचना प्रशासकांना व्यक्तिगत निरोपांतून पाठवतो. त्याचा कमीतकमी निरोप मिळावा, ही देखील माझी वाजवी इच्छा आहे. येणाऱ्या प्रत्येक निरोपाला, तो कितीही अवाजवी असला तरी, प्रशासकाने उत्तर द्यावे. ही अगदी रास्त अपेक्षा आहे. मग तो निरोप ओटोजनरेटेड असला तरी चालेल.

चित्तरंजन