प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.
संजयजी .. ह्या अनुभव कथनातून माणसे ओळखण्यात आपण (अर्थात मी सगळ्यांबद्दल बोलणे तसे योग्य नाही पण) चूक करतो हेच मला सुचवायचे आहे. कुमारला ओळखण्यात मी चूक केली पण त्याची जाणीव मला कधी होऊ शकली? पहिल्या निकालानंतर तो का आला नसावा ह्याचा मी विचार केला त्यावेळी मला असे वाटले की तो व सोनटक्के भेटले असतील आणि त्याला हे समजले असेल की सोंनटक्केनी परस्पर निकाल आणला, त्यावेळी कदाचित त्याला त्यांचा राग आला असेल आणि मला कसे तोंड दाखवू असे त्याला वाटले असेल, असा मी तर्क केला होता. कारण ते दोघे मित्र होते. ज्यावेळी सोनटक्के अपिलाकरता माझ्याकडे आले होते तेव्हां देखील मला कुमारबद्दल काही शंका यायची गरज नव्हती. कारण तो शेवटी एक मध्यस्थ होता. आणि मी देखील सोनटक्केंना दुसरी संधी दिलीच की. त्यांनी परस्पर निकाल नेऊ नये ह्याची त्यांना जाणीव असावी म्हणून अर्जही लिहून दिलाच. पण ते पुन्हा तसेच वागले. अर्थात त्यांच्या तशा वागण्याचे कारण नंतर समजते. एक मात्र खरे की मनस्ताप झाला असला तरी शेवटी मला मिळालेला धक्का अनपेक्षित पण सुखद होता. पण तुम्ही केलेल्या विवेचनाबद्दल आणि स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
शशिकांतराव .. माझ्या व्यवसायात मला आलेल्या असंख्य अनुभवांपैकी हा अनुभव खरंच वेगळा होता. आणि तो ही व्यवसाय सुरू करताच आला होता. त्यामुळे ह्या अनुभवाने मला खरेच खूप काही शिकवले. आज ह्या व्यवसायात ३० वर्षे होऊन देखील तो अनुभव तेवढाच माझ्या मनात ताजा आहे. तुमच्या समजुतीच्या शब्दांबद्दल आभार.
कुशाग्र .. छे बुवा, एवढे काही मी केलेले नाही. पण एक खरे की नंतरच्या माझ्या आयुष्यात ह्या अनुभवाने माझी दृष्टी थोडीफार बदलली.
गंगाधरसुत .. एकदम सहमत. टक्केवारीबद्दल दुमत होऊ शकेल पण माणूस सगळा कधी समजत नाही, उमजत नाही. खरे तर आपणच आपल्याला किती कळतो हा ही प्रश्नच आहे. म्हणूनच सुधीर मोघे म्हणतात ते खरे आहे, मन मनास उमगत नाही... मग दुसर्याची बातच काय करा.
अरूंधती, संगीता, धनश्री गानू, .. मनः र्पूवक आभार. लोभ असावा.
पण ज्यांच्याजवळ असे अनेक अनुभव आहेत त्यांनी ते लिहून काढावेत आणि ही लेखमाला तयार व्हावी ही मनापासून ईच्छा आहे.