श्री.विनायक

एकदा इंग्रजी राजवटीचे फायदे घेतल्यावर इंग्रज नसते तरी प्रगती झाली असती असे म्हणणे स्वतःला फसवण्यासारखे आहे.

इग्रजांकडून भारताला जे फायदे झाले असतील, त्यामागे त्यांचा हेतू स्वार्थाचाच होता. त्यामुळे, त्याबद्दल कृतज्ञता बाळगण्याचे काही कारण मला दिसून येत नाही. असे करणे म्हणजे, लूट करून पळण्याऱ्या लुटारूंच्या थोडा माल, चुकून आपल्या हाती लागल्यास, लुटारूंचे आभार मानण्यासारखे झाले.

भारताची स्थिती अफगाणिस्थानसारखीच झाली असती हे भोमेकाकांचे म्हणणे पटते.

भौगोलिक व राजकीय कारणांनी तसे घडणे, एखादवेळेस शक्य होते. पण, अफ़ग़ाणीस्थानावरही इतरांनी आक्रमणे केलीच होती. आपल्यात आणी त्यांच्यात बराच फरक आहे. अफगाण आजही पारतंत्र्यातच आहे. त्यामुळे, आपली प्रगती झाली नसती किंवा आपला अफगाण झाला असता, असे म्हणणे, म्हणजे, स्वकीयांवर संपूर्ण अविश्वास दाखविण्यासारखे आहे.

मयुरेश वैद्य.