>आता डोळे मिटून शांत पडून राहवसं वाटतय.

>उत्तम शारिरीक आरोग्य प्राप्त करायला रोज किमान काही वेळ व्यायाम करावा

आणि ...

>तुम्ही शरीराचा एकसंध वेध घ्या, ‘संपूर्ण शरीर ही एक जाणीव आहे’ हा तुमचा अनुभव करा

>मी आतापर्यंत दोन-तीन वेळा असे करू शकलोय, पण असे केल्यास मला एकापाठोपाठ एक जांभया येतात.

= दोन्ही प्रश्न सारखेच आहेत. एकदम मनापासून उत्तर देतोय, सगळ्यांना उपयोगी होईल, कृपया लक्षपूर्वक वाचा:

समाधीचा साधा अर्थ आहे : रिलॅक्सेशन. हे रिलॅक्सेशन आपल्याला प्रत्येक प्रसंगात आणता आलं की आयुष्य मजेचं होतं. आपल्याला इतक्या रिलॅक्सेशनची सवय नसल्यानी झोप येते किंवा नुसतं पडून राहावंस वाटतं.

जसजसे आपण मनाच्या कल्लोळातून मुक्त होत जातो तसतसा आपला श्वास मोकळा होत जातो, एका क्षणी तुम्हाला श्वासाची लय सापडते, इतका वेळ विस्मरणात गेलेली श्वासाची प्रक्रिया जाणीवेच्या कक्षेत येते. हा पॉइंट ऑफ टाईम अत्यंत महत्त्वाचा आहे आता ही श्वासाची लय धरून ठेवा, हा उत्साहाचा आणि आरोग्याचा स्त्रोत आहे. आता तुम्हाला जांभई येणार नाही किंवा नुसतं पडून राहावंस वाटणार नाही, तुम्ही जागृत रहाल. या मिळालेल्या उत्साहातून श्वासाचं भान ठेवून काहीही करा, फिरायला जा, घरातली शारीरिक कामं करा, योगासनं करा, सावकाश सूर्यनमस्कार घाला किंवा चहा घ्या इट इज ऑल योर चॉइस. होताहोईल तो पेपर वाचणं किंवा टीव्ही बघणं करू नका, तुमची चित्तदशा कायम राहिल.

संजय