फार विचित्र अवस्था होते ह्या 'जर तर' च्या प्रश्नावरून-
१८०० नंतर इंग्रजांचे ह्या भागावर लक्ष वाढले - मध्यंतरीच्या काळात पोर्तुगीजांनी पण भारतात बस्तान बसवले - त्यांचा नंबर इस्लामी राजवटीच्या खालोखाल लागतो. इस्लामी राजवटीत अनन्वित अत्याचारांना सामना करायला लागलेल्या व पदोपदी अपमान व छळ झालेल्या भारतीय जनतेला इंग्रजाचे अत्याचार म्हणजे फारसे विशेष वाटलेच नसावेत.
विनायक राव, इंग्रजांनी ह्या भागांत येण्याचे कारण व नंतर स्वतःची राजवट आणण्यासाठी त्यांचा येथील मुक्काम म्हणजे निव्वळ योगायोगच असावा. कारण कुठलीही सांस्कृतिक, वैचारिक, भाषिक, सामाजिक, राजकीय किंवा पर्यावरणीय जवळीक नसलेल्या देशांत राहून तेथल्या जनतेशी समरस होण्यासाठी त्यांना प्रयास तर पडलेच असतील. त्यातही भारतीय जनजीवन व त्यांचे जनजीवन ह्यातला जमीन अस्मानाचा फरक लक्षात घेता त्यांनी येथे बस्तान बसवण्याचे कारण जाणण्याची उत्सुकता आता आहे. कोणी आजच्या घडीला भारतात बस्तान बसवायचे ठरवल्यास, येथल्या प्रगतीचा वेग पाहता, त्याचे विशेष नवल वाटणार नाही परंतू त्यांच्या दृष्टीने त्या वेळेच्या मागास अशा भागात त्यांनी येथे येण्याचे कारण काय असावे.
अफ्रिकन देशांतले पर्यावरण भारतापेक्षा अधिक डावे ठरले असावे. तेथल्या स्थानिकांत काहीही सुधारणा होण्याची चिन्हे त्यांना दिसली नसावीत. इस्लामिक देशांत त्यांना स्वतःचाच धर्म डुबण्याची भिती वाटली असावी (येथे धर्माचा प्रचार तरी करता आला व जोडीला कित्येक बाटवले ते वेगळेच !) त्या मानाने भारत ही एक समृद्ध भूमी तर होतीच परंतू येथील स्थानिकांत आपापसात वितूष्ठ होते व त्यांना आपल्या वैचारिक साच्यांत बांधता येण्याची पूर्ण शक्यता असल्याने इंग्रज येथे बस्तान बसवायला तयार झाले असावेत....... असा माझा विचार आहे.
मयुरेश चे एक वाक्य पटले.... 'लाखोंच्या संख्येवर राज्य करायला लागेल म्हटल्यावर काही लोकाभिमुख कामे करणे भाग होतेच !' ह्या बरोबर मला तर असेंही वाटते की, स्वतःच्या फायद्याची लोकाभिमुख कामे सर्वप्रथम त्यांनी हातात घेतली.
बाकी 'जर तर' ना कित्येक पर्याय निघू शकतात. प्रत्येक वेळची परिस्थिती समान होतीच असेही नाही. एक लढाई जिंकून आल्यावर लागोलागची दुसरी लढाई हरल्याची कित्येक उदाहरणे भारतीय इतिहासात सापडतील - अगदी तात्या टोपें पर्यंत म्हणूनच हा विषय विचित्र व अवघड आहे.
प्रत्येक प्रतिसाद ज्ञानांत व माहितीत नविन भर टाकीत आहे म्हणूनच मी नविन विषय ह्यात घेतला -